Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअखेर कंगनाची माघार; बीएमसीला करणार 'ही' विनंती

अखेर कंगनाची माघार; बीएमसीला करणार ‘ही’ विनंती

illegal-merger-of-flats-kangana-ranaut-to-seek-regularisation-from-bmc
illegal-merger-of-flats-kangana-ranaut-to-seek-regularisation-from-bmc

मुंबईः खारमधील इमारतीतील तीन फ्लॅट्स अवैधरित्या एकत्र केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं सुरु केलेल्या कारवाईविरोधातील याचिका बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं अखेर मागे घेतली आहे.

कंगनानं खार येथील एका इमारतीत तीन फ्लॅट खरेदी केले असून तिनं हे तीन फ्लॅट एकत्र केले आहेत. मात्र, घरात हा बदल करताना इमारतीच्या प्लानमधील मुख्य स्ट्रक्चरमध्ये बदल केल्याचं पालिकचं म्हणणं आहे. यासंबंधी पालिकेनं कंगनाला नोटीस बजावली होती. या नोटिशीविरोधात तिनं हायकोर्टात धाव घेतली होती.

याप्रकरणी कंगनानं दाखल पालिकेविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. तसंच, मुंबई महानगरपालिकेकडे बांधकाम नियमित करुन घेण्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती कंगनानं वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.

यावर न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी कंगनाला ही मुभा देत, कंगनाने अर्ज केल्यास पालिकेने त्या तारखेपासून चार आठवड्यांत योग्य तो निर्णय द्यावा आणि निर्णय विरोधात असल्यास पालिकेने त्या अनुषंगाने कार्यवाही दोन आठवड्यांपर्यंत करू नये, असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.

दरम्यान, कंगना राणावत हिच्या ट्विटर अकाउंटवर बंदी घालावी अशी आणखी एक याचिका अॅड अली काशिफ खान देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसंच, या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती देशमुख यांनी केली आहे. या मागणीवर न्यायालयानं ९ मार्चला सुनावणी ठेवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments