Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमी पुन्हा आलो; अजित पवारांच्या त्या फोटोवर सोशल मीडियावर धूम

मी पुन्हा आलो; अजित पवारांच्या त्या फोटोवर सोशल मीडियावर धूम

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा २३ नोव्हेंबर रोजी गुपचूप शपथविधी उरकला होता. सर्व राजकीय घडामोडीनंतर ७९ तासात ते सरकार कोसळलं होतं. आज पुन्हा अजित पवारांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर भगतसिंह कोश्यारी आणि अजित पवारांचे हस्तांदोलन केले. ते फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरलं होत आहे. मी पुन्हा आलो.. मी पुन्हा आलो.. अशा वेगवेगळ्या प्रकारचे मिम्स येत आहेत.

Ajit pawar governor oath,Ajit, pawar, governor, oath

मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा २३ नोव्हेंबर रोजी गुपचूप शपथविधी उरकला होता. त्यावेळी त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली होती. या सर्व प्रकारामुळे सर्वांना धक्का बसला होता. परंतु ७९ तासानंतर अजित पवार यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला होता त्यानंतर हे सरकार कोसळलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. पुन्हा अजित पवारांनी आज ३० डिसेंबररोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते आताही तेच राज्यपाल आहेत. त्यामुळे आज घेतलेल्या शपथविधीचे फोटोवर जोरदार कमेंटस् येत आहेत. त्यामुळे कोणत्या नेत्याला मंत्रिपद मिळाले यापेक्षा अजित पवारांच्या त्या फोटोवर जास्त चर्चा सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments