Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईहायटेक शपथविधी : ६ हजार चौरस फुटाचं व्यासपीठ; २० एलईडी आणि ७०...

हायटेक शपथविधी : ६ हजार चौरस फुटाचं व्यासपीठ; २० एलईडी आणि ७० हजार खुर्च्या

Image: ANI

मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी सायंकाळी ६.४० वाजता उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक बनवण्यासाठी शिवाजी पार्क जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातील अनेक महत्त्वाच्या नेते हजेरी लावणार आहे. हा सोहळा हायटेक होणार असल्यामुळे जंगी तयारी सुरु आहे.

शिवाजी पार्कात शपथविधी सोहळ्यासाठी ६ हजार चौरस फुटाचं व्यासपीठ तयार केलं जात आहे. व्यासपीठावर १०० खुर्च्या असणार आहेत. ७० हजार खुर्च्यांची व्यवस्था केली जाणार आहे. उद्धव ठाकरेंसोबत इतर मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्कवर जाऊन मुंबई महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तिन्ही पक्षाच्या काही आमदारांना शपथ दिली जाणार आहे. यामुळे राज्यातील कार्यकर्ते,पदाधिकारी या सोहळ्यासाठी उपस्थितीत राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments