Placeholder canvas
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराज्यपालांनी केली मुंबई मॅरथॉनसाठी नावनोंदणी “मॅरथॉन लोकशाही व सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारी...

राज्यपालांनी केली मुंबई मॅरथॉनसाठी नावनोंदणी “मॅरथॉन लोकशाही व सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारी स्पर्धा”

मुंबई : श्रीमंत – गरीब, तरुण – वृद्ध, महिला – पुरुष, दिव्यांग – सामान्य यांसारखे सर्व भेद दूर करणारी मॅरथॉन लोकशाही व सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारी स्पर्धा आहे. प्रत्येक गाव, जिल्हा तसेच महानगराकरिता आपली एक मॅरथॉन स्पर्धा असावी. त्यातून परस्पर बंधुभाव वाढून राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल, असे उद्गार राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे काढले.

रविवार दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी होणार्‍या टाटा मुंबई मॅरथॉन स्पर्धेच्या नावनोंदणीला राज्यपालांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. २४) राजभवन येथे प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.

मॅरथॉन स्पर्धेने फिटनेस व आरोग्याबद्दल व्यापक जनजागृती केली आहे. स्पर्धेने विविध समाजसेवी संस्थांसाठी ४० कोटी निधी उभारले आहेत, याबद्दल राज्यपालांनी आयोजकांचे अभिनंदन केले. सन २०२० साली होणाऱ्या मॅरथॉन स्पर्धेत ५०००० लोक सहभागी होतील तसेच मॅरथॉनच्या माध्यमातून सेवा कार्यासाठी ५० कोटी रुपये निधि संकलित केले जातील, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई मॅरॉथॉन ही पर्यावरण पूरक ग्रीन मॅरॉथॉन होईल, असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री अशिष शेलार यांनी मुंबई मॅरॉथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला आमदार राज पुरोहित, उपमहापौर हेमांगी वरळीकर, रिअर ॲडमिरल राजेश पेंढारकर, शायना एन सी व प्रायोजक संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments