Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढणार

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढणार

Prithviraj Chauhan,Chavan,Prithvirajमुंबई: राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले यांनी भाजपात घरवापसी केली. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात 21 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पोटनिवडणूक लढणार आहेत. यामुळे भाजपाचे उदयनराजे विरुध्द पृथ्वीराज चव्हाण असा सामना रंगणार आहे.

सातारा हा मतदारसंघ आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडे आहे. परंतु काँग्रेसने येथून निवडणूक लढवावी अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे माजी मुख्यमंत्री चव्हाण हे मैदानात उतरणार आहेत.

शरद पवारांनी उदयनराजे भोसले यांच्या पक्षांतरानंतर साता-यात मोठी रॅली काढली होती. त्यावेळी त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शरद पवार हे माझ्या वडिलांसारखे आहेत. ते जर निवडणूक लढवत असतील तर मी निवडणूक लढणार नाही. असेही जाहीर केले होते.

आता काँग्रेस आघाडीचे पृथ्वीराज चव्हाण हे मैदानात उतरणार आहे. तर भाजपाकडून भोसले मैदानात असणार आहे. त्यामुळे चांगला सामना रंगणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments