Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकाँग्रेसची पहिली यादी जाहीर, या 51 उमेदवारांना उमेदवारी

काँग्रेसची पहिली यादी जाहीर, या 51 उमेदवारांना उमेदवारी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस महाआघाडीतील काँग्रेस पक्षाने अखेर त्यांच्या 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांसह ब-याच विद्यमान आमदारांचा समावेश आहे.

काँग्रेसने पितृपक्ष संपल्यानंतर काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विशेष म्हणजे युतीचं अद्याही ठरलं नसून, काँग्रेस आघाडीने यंदा उमेदवारांची घोषणा करण्यात बाजी मारली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी केली आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या आहेतअसं शरद पवार यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे. त्यामुळे इतर उमेदवारांचे नाव कधी घोषित होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Congress,Candidate list, Assembly Elections 2019,Assembly,Elections 2019,Elections

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments