मुंबई : मुंबईतील चर्नी रोड येथील ड्रीमलँड सिनेमाजवळ आदित्य अक्रेड या निवासी इमारतीला रविवारी सकाळी भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. इमारतीमधील रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले.
मुंबईतील चर्नी रोड येथे ड्रीमलँड सिनेमाजवळील एका निवासी इमारतीला रविवारी सकाळी भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच काही वेळाने अग्निशमन दलाचे बंब आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. इमारतीमध्ये अनेक रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरुप बाहेर काढले. अजूनही बचावकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही.
आग लागलेल्या इमारतीत सात ते आठ जण अडकल्याचं सुरुवातीला सांगण्यात येत होतं. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. काही वेळानं अग्निशमन बंब आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ बचावकार्य हाती घेतलं. काही कर्मचाऱ्यांनी क्रेन आणि शिडीच्या मदतीनं इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढलं. या दुर्घटनेत सुदैवानं कुणीही जखमी अथवा कोणतीही जीवितहानी झालं नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
Mumbai: Cooling operation by the fire brigade is underway at Aaditya Arcade building at Charni road, where a level-3 fire broke out this morning. pic.twitter.com/fbeBOHr6kX
— ANI (@ANI) October 13, 2019