Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअखेर बीएसएनएलच्या ७७ हजार कर्मचाऱ्यांनी घेतला व्हीआरएस

अखेर बीएसएनएलच्या ७७ हजार कर्मचाऱ्यांनी घेतला व्हीआरएस

BSNLमुंबई : ‘भारत संचार निगम लिमिटेड’(बीएसएनएल) डबघाईस आली आहे. त्यामुळे कर्मचा-यांच्या संतापानंतर केंद्र सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली होती. यानंतर आतापर्यंत स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा ७७ हजारांवर गेला आहे.

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणारी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) योजना जाहीर केली होती. बीएसएनएलचे ७० ते ८० हजार कर्मचारी योजनेत पात्र ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच, यातून कंपनीला वर्षांला ७,००० कोटी रुपयांच्या वेतन खर्चात बचत शक्य होणार असल्याचेही सांगण्यात आले होते. यानंतर आतापर्यंत स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा ७७ हजारांवर गेला आहे.

सध्या बीएसएनएलमध्ये १ लाख ५० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी १ लाख कर्मचारी व्हीआरएसच्या कक्षेत येतात. ३ डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना अर्ज करता येणार आहे. आतापर्यंत ७७ हजार पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय निवडला आहे.कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती योजना ४ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, ३ डिसेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments