Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईबाप मुख्यमंत्री मुलगा कॅबिनेट मंत्री

बाप मुख्यमंत्री मुलगा कॅबिनेट मंत्री

Uddhav Thackeray ,Aaditya Thackeray, shiv sena, maharashtra cabinet, maharashtra chief minister, cabinet minister, maharashtra cabinet, mantralaya, aaditya, thackeray , worli constituencyमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज सोमवारी विस्तार झाला. बाप मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री असं चित्र महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपदी तर त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणार आहेत. यामुळे बाप लेकाच्या जोडीचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंत्र्यांना शपथ दिली. या मंत्रिमंडळात राज्याची ही विधानसभा निवडणूक अनेक गोष्टींनी स्मरणात राहावी अशीच झाली आहे. महिनाभराचं सत्तानाट्य, त्यानंतर अजित पवारांनी आणलेला क्लायमॅक्स आणि दोन टोकांच्या पक्षांचं सरकार असे अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी महाराष्ट्रानं बघितल्या. ही मालिका अजूनही सुरूच आहे. पण, विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात बहुदा पहिल्यांदाच मुलगा आणि बाप एकाच मंत्रिमंडळात सोबत काम करणार आहे. हे दुर्मिळ दृश्य महाराष्ट्राला येत्या काळात बघायला मिळणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकार मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंत्र्यांना शपथ दिली. यात एक नाव होत आदित्य ठाकरे यांचं. सत्तेच्या प्रवाहापासून दूर राहुन महाराष्ट्राचं राजकारण आणि सत्ता चालवणाऱ्या ठाकरे कुटुंबानं यावेळी सक्रिय राजकारणात उडी घेतली. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे बरोबरच उद्धव ठाकरेही सत्तेत सहभागी झाले आणि मुख्यमंत्रीही बनले. त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणार आहे. बाप मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री असं चित्र महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. हे राज्याच्या राजकारणात प्रथमच बघायला मिळत आहेत.

आदित्य ठाकरेंचा असा झाला प्रवास…

आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थीदशेपासूनच राजकारणाला सुरुवात केली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर विस्तारलेल्या युवा सेनेचं प्रमुखपद त्यांच्याकडं आलं आणि आदित्य ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आलं. आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेचं प्रमुखपद सांभाळताना शिवसेनेच्या विस्ताराचंही काम केलं. गेल्या वर्षभराच्या काळात ते अधिक सक्रिय झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं जन आशिर्वाद यात्रा काढली.

वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या आदित्य ठाकरे यांना शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवलं. तेच मुख्यमंत्री होणार असल्याचं शिवसेनेकडून सांगितलं गेलं. पण, निकालानंतर हा सूर बदलला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. विशेष म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली. कॅबिनेट मंत्री म्हणून आदित्य ठाकरे नवखे असणार आहेत. मात्र, वडिलांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments