मुंबई: महाराष्ट्रात सत्तापालट झालं. महाराष्ट्र विकास आघाडीचं नवं सरकार स्थापन झालं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय निवासस्थान वर्षा बंगला सोडावा लागला. आता फडणवीस विरोधीपक्षनेते झाल्यामुळे त्यांना मलबार हिल येथील ‘सागर’ बंगला देण्यात आला आहे. यामुळे फडणवीसांचा मुक्काम ‘सागर’ या नवीन ठिकाणी असणार आहे.
आणि शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीच्या सहा मंत्र्यांचा शपथविधीही झाला. या मंत्र्यांना शासकीय बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना वर्षा बंगला मिळाला. महाराष्ट्र विकास आघाडीच्या चार मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप झाले आहेत. यातील शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे. मात्र शिवसेनेचे सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेत थोरात आणि नितीन राऊत या तीन मंत्र्यांना अद्याप बंगल्याचे वाटप झालेले नाही.