Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईTask Force for Corona Vaccination l कोरोना लसीकरणासाठी राज्यात टास्क फोर्स; मुख्यमंत्री...

Task Force for Corona Vaccination l कोरोना लसीकरणासाठी राज्यात टास्क फोर्स; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई l कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. दिल्ली, मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi आणि कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी राज्यात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची स्थापना केल्याची माहिती दिली आहे.  Establishment of Task Force for Corona Vaccination

‘कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्यानं बोलणं सुरु आहे. महाराष्ट्रात लसीकरण कशाप्रकारे करावं, लसीचं वितरण यासंदर्भात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेट

ऑक्सफर्ड-सिरम इन्स्टिट्यूटची लस डिसेंबरपर्यंत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याचा दावा सिरमच्या अदर पुनावाला यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या राजदूतांसह सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.

100 देशांचे राजदूत 27 नोव्हेंबरला पुण्यात दाखल

100 देशांच्या राजदूतांच्या दौऱ्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी एक बैठक घेत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. 100 देशांचे राजदूत 27 नोव्हेंबरला पुण्यात दाखल होतील. त्याबाबत प्रशासनाला दौरा प्राप्त झाला आहे. तर 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा l प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक ईडीच्या ताब्यात

दरम्यान पंतप्रधान मोदींचा दौरा अद्याप प्राप्त झाला नसल्याचं कळतंय. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमनी सौरभ राव यांची भेट घेत दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहे. पंतप्रधान मोदी हे 100 देशांच्या राजदूतांसह सिरम इन्स्टिट्यूट निर्माण करत असलेल्या कोरोना लसीचा आढावा घेणार आहेत.

‘सिरम’ची कोरोना लस 225 रुपयांना

सिरम इन्स्टिट्यूटच्या लस उत्पादनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. त्यामुळे आता सिरमची कोरोना लस साधारण 225 रुपयांना उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

बिल गेट फाउंडेशन 150 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार

सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाउंडेशनबरोबर महत्त्वपूर्ण करार झाला. या करारानुसार बिल गेट फाउंडेशन सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल 150 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहे. या माध्यमातून सिरम इन्स्टिट्यूट तब्बल 100 मिलियन डोस तयार करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments