Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराज्यातील आलेल्या पूर परीस्थिती मुळे यंदा दहीहंडी उस्तव थंडावला

राज्यातील आलेल्या पूर परीस्थिती मुळे यंदा दहीहंडी उस्तव थंडावला

मुंबई: यंदा विधानसभा निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय हंड्या लागतील, अशी अपेक्षा केली जात होती. पण, त्याच्या उलटे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाकडून होणारी आयोजनांची संख्या घटली आहेच, पण शिवसेना, भाजप, मनसे या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही आयोजनाबाबत प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. पक्षाच्या वरिष्ठांकडून दहीहंडी आयोजनांबाबत नेमकी स्पष्टता येत नसल्यामुळे आयोजन करावे की नाही, हेच कळेनासे झाल्याची प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
गिरगाव, दादर, कुर्ला, भांडुप, घाटकोपर, बोरिवली, चारकोप अशा अनेक भागात पोलिसांकडेही यंदा दहीहंडी आयोजनांसाठी येणाऱ्या परवानगी अर्जांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. उत्सवासाठी मंडळाचा विमा काढणाऱ्या मंडळांची संख्याही ९०० वरून ६००च्या घरात आली आहे.

ठाण्यातही दहीहंडी चा उत्सव थंडावला
दहीहंडी उत्सवाची पंढरी असा नावलौकीक असलेल्या ठाण्यात दर वर्षी गोकुळाष्टमीपूर्वी किमान १५ ते २० दिवस गोविंदाचा गजर सुरू होत असे. मात्र, यंदा उत्सवाला अवघे एक दिवस शिल्लक असतानाही शहरात कोणताही उत्साह दिसून येत नाही. लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या चढाओढीचे थरही यंदा कोसळले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यंदाच्या उत्सवाचे थर पुन्हा नव्या जोमाने लागतील ही आशाही जवळपास मावळली आहे.
परंपरा जपण्यासाठी उत्सव साजरे करण्याकडे आयोजकांचा कल असून मोठमोठी बक्षिसे किंवा कलाकारांचे परफॉर्मन्स यंदा ठाण्याच्या उत्सवात धूसर दिसू लागले आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, उत्सवाला आर्थिक बळ देणाऱ्या उद्योजकांना पडलेला मंदीचा वेढा आणि आयोजकांमधली मरगळ अशी अनेक कारणे त्यामागे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments