Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकाळवीट प्रकरणी सलमानला जोधपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

काळवीट प्रकरणी सलमानला जोधपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Salman Khanजयपूर : काळवीट शिकार प्रकरणी आज शुक्रवारी 27 सप्टेंबरला बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा सत्र न्यायलयात सुनावणी होणार आहे. यामुळे सलमानच्या चाहत्यांच्या नजरा न्यायालयाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाकडून सलमान खानला पाच वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पण शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच त्याला जामीनही मंजूर करण्यात आला होता. पण सुनावणी दरम्यान, सलमानला न्यायालयात उपस्थित राहावे लागेल, असे आदेशही न्यायालयाने दिले होते.

गेल्या सुनावणी दरम्यान सलमान न्यायलयात हजर राहिला नव्हता. त्यानंतर, न्यायाधिशांनी सलमानच्या वकिलांना खडसावले होते. नंतरच्या सुनावणी दरम्यान सलमानने उपस्थित राहणे गरजेचे आहे. तसेच जर तो सुनावणी दरम्यान उपस्थित राहिला नाही, तर त्याचा जामीन रद्द करण्यात येईल, अशी ताकीदही न्यायाधिशांनी दिली होती.

यावेळीही सलमान खान न्यायालयात उपस्थित राहिला नाही, तर त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, 1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, या सिनेमातील कलाकार सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि स्थानिक व्यक्ती दुश्यंत सिंह यांनी काळवीटाची शिकार केली होती. त्यामुळे या खटल्यात हे सर्वजण आरोपी आहेत. त्यामुळे सलमान खान हजर राहतो की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments