Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई...तरीही सरकार पाठ का थोपटून घेत आहे;फडणवीसांचा सरकारला सवाल

…तरीही सरकार पाठ का थोपटून घेत आहे;फडणवीसांचा सरकारला सवाल

मुंबई : कोरोना काळात महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा आहे असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. करोनाची लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मात्र सर्वाधिक करोना मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. तसंच अजूनही करोनाचे रुग्ण वाढत आहेत तरीही सरकार का पाठ का थोपटून घेत आहे ते समजत नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला जी अंतरिम स्थगिती मिळाली ती या सरकारच्या अयोग्य भूमिकेमुळेच असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अधिवेशनही अवघ्या सात तासांचं घेतलं जातं आहे. त्याला काहीही अर्थ नाही आम्ही जनतेचे प्रश्न कसे काय मांडायचे? असंही देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं आहे. तसंच या सरकारने  वाढीव वीज बिलांबाबत घूमजाव केलं. कोल्हापुरात पुरात वाहून गेलेल्या एका घरालाही अडीच हजारांचं बिल पाठवण्यात आलं आहे

त्यावरुनच सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत. वाढीव वीज बिलांबाबत आणि सरकारच्या या धोरणाबाबत आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मेट्रो कारशेडचं काम हे फक्त आणि फक्त अहंकारातून कांजूरमार्गला हलवण्यात आलं.

फक्त राजकीय आकसापोटी सुरु असलेल्या योजना हे सरकार बंद करतं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर आम्ही बहिष्कार घालतो आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments