मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाची लस घेतली. जे. जे. रुग्णालयात को व्हॅक्सीन ही लस त्यांनी घेतली आहे. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या मातोश्री यांनी लस घेतली आहे. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोविड लसीचा पहिला डोस घेतला.
CM Uddhav Balasaheb Thackeray took his first shot of COVID vaccine today. pic.twitter.com/3JWlmvKpHL
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 11, 2021
मुंबईतल्या जे जे हाँस्पिटलमध्ये ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लस घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री अशा तीन जणांना लस देण्यात आली. यापूर्वीी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कुटुंबासह कोविडशिल्ड लस घेतली होती.
मुंबईमध्ये कोरोनाचा धोक वाढत चालला आहे. त्यामुळे काही ठिकाणी कठोर निर्बंध लावण्याच्या हालचाली सुरु आहे. विशेष म्हणजे कालच अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन आटोपल्यानंतर आज कोरोनाची लस घेतली. त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.