Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईछगन भुजबळ यांची अधिकृत सुटका झाली!

छगन भुजबळ यांची अधिकृत सुटका झाली!

मुंबई :केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेले राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या जामिनावरील सुटकेच्या कादपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. यानंतर भुजबळ यांच्या जामिनावर सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यांना हॉस्पिटलमधून घरी कधी सोडले जाईल, याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतला जाणार आहे.

दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असलेल्या भुजबळ यांना कोर्टाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. मात्र आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता आणि प्रक्रिया शिल्लक असल्याने त्यांची अधिकृतपणे सुटका झाली नव्हती. आज सुटकेबाबतच्या कागदपत्रांसह पोलीस केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि भुजबळांची आज सुटका होणार हे निश्चित झाले. सुटकेबाबतची ही प्रक्रिया सुमारे अडीच ते तीन तास चालली.

डिस्चार्जचा निर्णय डॉक्टर घेणार…
जामीनावरील सुटेकेबाबतच्या सर्व कागदपत्रांवर भुजबळांच्या स्वाक्षऱ्या झाल्या असल्या, ते उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने भुजबळ आणखी काही दिवस केईएम हॉस्पिटलमध्येच असतील. भुजबळ यांना स्वादुपिंडाचा त्रास जाणवत असून त्यावर ते उपचार घेत आहेत. या कारणामुळे त्यांना घरी कधी जाऊ देणार याबाबतचा निर्णय डॉक्टर घेणार आहेत. मात्र, ते आणखी ४ ते ५ दिवस रुग्णालयात राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भुजबळ आपल्या मुंबईतील निवासस्थानी जातील असे समजते. मुंबईत ते विश्रांतीनंतर आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांना भेटतील. त्यानंतर काही दिवसांनी ते नाशिकला रवाना होतील असे समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments