Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रसुटकेनंतर भुजबळांची पहिली भेट शरद पवारांशी

सुटकेनंतर भुजबळांची पहिली भेट शरद पवारांशी

मुंबई : छगन भुजबळ हे लवकरच पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात परतण्याची चर्चा सध्या सुरू आहे. छगन भुजबळ गुरुवारीच रुग्णालयातून मुंबईतील घरी आले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांनी सिलव्हर ओक या निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळत नसल्याचे त्यांना दीर्घ काळ तुरुंगात राहावे लागले. मात्र गेल्या आठवड्यात त्यांना प्रकृती अस्वास्थ्याचे कारण मान्य करत कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतरही जवळपास दोन दिवस छगन भुजबळ हे उपचारासाठी रुग्णालयातच होते. गुरुवारी डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याच्या अटीवर रुग्णालयातून सुटी दिली होती. त्यामुळे काही दिवस छगन भुजबळ हे विश्रांती घेणार असे वाटत होते. मात्र भुजबळांनी शुक्रवारी सकाळीच शरद पवारांची भेट घेतल्याने, ते आता लवकरच पुन्हा सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवारांचाच पहिला फोन
शरद पवारांचाच पहिला फोन आला. सुटकेनंतर शरद पवारांशी काही बोलणे झाले का, या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, जामिनावर सुटका झाल्यानंतर सर्वात पहिला फोन शरद पवारांचाच आला होता. एकदा बरा झालो की नाशिक काय, महाराष्ट्र काय अगदी भारतभर फिरणार आहे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments