Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसीडीआर प्रकरण: रिझवानची आज ५ वाजेपर्यंत करा सुटका - मुंबई उच्च न्यायालय

सीडीआर प्रकरण: रिझवानची आज ५ वाजेपर्यंत करा सुटका – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई: सीडीआर प्रकरणी अटकेत असलेल्या रिझवान सिद्धिकी याला आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत सोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. आजच याप्रकरणी आरोपी अड.रिझवानचे बॉलीवूड कनेक्शन पुढे आले होते. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने रिझवानच्या सुटकेचे आदेश दिले आहेत.

अभिनेता ऋतिक रोशनचा नंबर कंगना रानावतने रिझवानला दिल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली होती. यासोबतच अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयशाने साहिल खानचा सीडीआर रिझवानला पाठवल्याचेही पोलीस तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात ज्यांची नावे पुढे येतील त्यांना चौकशीसाठी बोलविणार असल्याची माहितीही त्रिमुखे यांनी दिली होती. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाने रिझवानच्या सुटकेचे आदेश दिल्यानंतर सीडीआर प्रकरणाला कुठले वळण लागणार हा चर्चेचा विषय होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments