Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसिनेटवर युवा सेनेचा कब्जा!

सिनेटवर युवा सेनेचा कब्जा!

Yuva sena, Shev sean, mumbai univercity

मुंबई : सिनेट निवडणुकीत भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला धक्का देत युवा सेनेने शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. दहापैकी दहा जागांवर युवा सेनेचे उमेदवार विजयी झाले. या विजयानंतर शिवसेना भवन येथे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील शिवसेना भवनात उपस्थिती लावली.

मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातील सिनेट निवडणुकीत युवा सेनेने १० पैकी १० जागा जिंकत विद्यापीठावर युवासेनेचा भगवा फडकवला आहे. त्यामुळे सिनेटच्या १० जागांवर युवासेनेचे वर्चस्व राखले. या निवडणुकीत युवा सेनेच्या शीतल देवरुखकर यांनी युवा सेनेचे खाते खोलले होते. त्यांनी महिला प्रवर्गात १८ हजार ५०० मतांसह बाजी मारली. एकूण १० जागांसाठी मतदान झाले असून मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली होती.
युवा सेनेचे विजयी उमदेवार-

  • महादेव बाबुराव जगताप
  • सुप्रिया गजानन करंडे
  • प्रवीण महादेव पाटकर
  • मिलिंद हरिश्चंद्र साटम
  • प्रदीप सावंत
  • शीतल देवरूखकर
  • निखिल जाधव
  • धनराज कोहचाडे
  • शशिकांत झोरे
  • राजन कोलंबकर
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments