Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसोमवारी १२ वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी

सोमवारी १२ वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी

Uddhav Thackeray will take oath as CMमुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार यावरून बरीच चर्चा रंगली होती. अखेर सोमवारी ३० डिसेंबरला दुपारी १२ वाजता विधानभवनाच्या प्रांगणात मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी होणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनीही मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी होणार असल्याचे दोन दिवसापूर्वीच सांगितले होते. मंत्रिमंडळ विस्तारावरून महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षात मतभेद नाहीत, असं भुजबळ यांनी सांगितलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा कॅबिनेट मंत्री फक्त मंत्रिमंडळात आहेत. शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचे दोन असे सहा मंत्री आहेत. आता महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments