Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई“टाळ्या-थाळ्या सोडून दुसरं काहीतरी सांगा”; ‘या’अभिनेत्रींचा मोदींना सवाल

“टाळ्या-थाळ्या सोडून दुसरं काहीतरी सांगा”; ‘या’अभिनेत्रींचा मोदींना सवाल

मुंबई : कोरोना विषाणूच्या हैदोसामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यापुढे करोनाचा सामना कसा करायचा? याबाबत आज रात्री आठ वाजता देशवासीयांना मार्गदर्शन करणार आहेत. मोदींच्या या सूचनेवर अभिनेत्री पूजा बेदी हिने जोरदार टीका केली आहे. टाळ्या- थाळ्या सोडून दुसर काहीतरी सांगा असा सवाल केला आहे.

पूजा बेदी म्हणाली…?

“आज रात्री आठ वाजता पंतप्रधान आपलं मार्गदर्शन करणार आहेत. मला आशा आहे, की यावेळी तरी ते टाळ्या आणि थाळ्या वाजवायच्या हे सोडून काहीतरी दुसरं सांगतील. लॉकडाउन प्रोटोकॉल, देशाची आर्थिक स्थिती, वैद्यकीय उपचार अशा विषयांना ते स्पर्श करतील, अशी अपेक्षा आहे.” अशा आशयाचे उपरोधिक ट्विट पूजा बेदी हिने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments