Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईविखे पिता - पुत्रांमुळे भाजपला फटका; राम शिंदेंचे टीकास्त्र

विखे पिता – पुत्रांमुळे भाजपला फटका; राम शिंदेंचे टीकास्त्र

Ram Shinde Radhakrishna Vikhe Patil,Ram, Shinde, Radhakrishna, Vikhe, Patilमुंबई : भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या पराभवानंतर अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यामध्ये मतभेद वाढले आहेत. विखे पिता पुत्रांनी पक्षविरोधी कारवाया केल्या त्यामुळेच माझा पराभव झाला अशी तक्रार शिंदे यांनी भाजपच्या कोअर कमिटीकडे केली आहे. त्यावर मुंबईत एका बैठकीमध्ये चर्चा सुरु आहे.

राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना विखे पिता पुत्रांवर गंभीर आरोप केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला तोटाच झाला आहे. शिंदे म्हणाले निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात आलेल्या अडचणींविषयी प्रदेश प्रतिनिधींकडे तक्रार केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात पूर्वी भाजपचे पाच आमदार होते. विखे आणि वैभव पिचड आल्यानंतरही आमदरांची संख्या वाढणे गरजेचे होती. परंतु ती ही संख्या तीनवर आल्याचे शिंदे म्हणाले. विशेष म्हणजे विखे पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करतांना अहमदनगरमधील सर्व १२ जागा जिंकून देऊ असा शब्द दिला होता. परंतु मतदारांनी भाजपला नाकारले. या बाबत पक्ष काय निर्णय घेणार याकडे माझे लक्ष लागले आहेत. असंही शिंदे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments