Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईनामदार बाळासाहेब थोरात नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली दरबारी

नामदार बाळासाहेब थोरात नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली दरबारी

Balasaheb Thorat elected as Congress Legislative Party leaderमुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र विकास आघाडीचे मंत्री बाळासाहेब थोरात काँग्रेस नेत्यांशी भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. दोन दिवसात राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी थोरात दिल्ली दरबारी पोहोचले आहेत अशीही चर्चा सुरु आहे.

काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, डॉ.नितीन राऊत यांच्या व्यतिरीक्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, यांच्यासह इतर नेत्यांचा मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेचं अध्यक्षपद मिळालं आहे. या व्यतिरीक्त काँग्रेसला 13 मंत्रीपद दिले जाणार आहेत. अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्री बाळासाहेब थोरात दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, अहमद पटेल, महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांच्यासह इतर नेत्यांशी भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे काँग्रेसच्या कोण कोणत्या नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments