Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईआरे वाचवा : शिवाजी पार्कला आज ‘निद्रा आंदोलन’

आरे वाचवा : शिवाजी पार्कला आज ‘निद्रा आंदोलन’

मुंबई : आरे जंगलामध्ये ‘मेट्रो ३’ कारशेडसाठी वृक्ष तोडण्यास वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. झाडांच्या कत्तलिला विरोध वाढला आहे. गेल्या २३ दिवसांत मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वीसहून अधिक निदर्शने झाली आहेत. आज रविवार  २२ सप्टेंबरला दादर येथे शिवाजी पार्कला मानवी साखळी करण्यात येणार आहे. तसेच निद्रा आंदोलन करण्यात येईल.

आरेमध्ये कारशेडजवळच सलग तीनही रविवारी मानवी साखळी करण्यात आली आहे. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने कारशेडच्या जागेसाठी २,६४८ वृक्ष हटवण्याची परवानगी २९ ऑगस्टला दिल्यानंतर ‘आरे वाचवा’ मोहीम अधिक तीव्र झाली. वनशक्ती संस्था आणि झोरू भथेना यांच्या याचिकांवर न्यायालयात मागील आठवडाभर सुनावणी सुरू असून त्याचवेळी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकदेखील रस्त्यावर उतरून हे आंदोलन तीव्र करत आहेत.

गेल्या पंधरा दिवसांत फ्रायडे फॉर फ्यूचर, वॉचडॉग अशा अनेक संस्था यामध्ये सक्रिय झाल्या आहेत. गुरुवारी माटुंगा येथे रुइया आणि रुपारेल महाविद्यालयांबाहेर विद्यार्थ्यांनीदेखील आरे वाचवासाठी सह्य़ांची मोहीम घेतली होती. मालाड, दादर, अंधेरी, चर्चगेट अशा रेल्वेस्थानकातदेखील चारही शुक्रवारी अनेक तरुणांनी मूक निदर्शने केली आहेत.

चार वर्षांपासून अम्रिता भट्टाचार्यजी यांनी सुरू केलेल्या ‘आरे कन्झर्वशेन ग्रुप’ समाजमाध्यमावरील समूहाच्या माध्यमातून अनेक पर्यावरणप्रेमी एकत्र आले होते. त्यांची स्वतंत्र अशी संस्था न करताच ‘आरे वाचवा’ ही मोहीम सुरू असून, गेल्या २३ दिवसांत या मोहिमेला अनेक संस्थांचा तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments