मुंबई : तिकीट कापल्यानंतर उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. तिकीट का कापले याचा जाब पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांना जरूर विचारेल असे सांगितले. पक्ष जो काय आहे तो विचार करेल. निवडणुकीच्या काळात कोण चूक कोण बरोबर याचा विचार करण्याची ही वेळ नाही, असं विनोद तावडे म्हणाले.
भाजपने विनोद तावडे यांच्या ऐवजी बोरिवलीतून सुनील राणे यांना तिकीट दिलं आहे. मी कार्यकर्ता आहे, तळागाळातल्या माणसांसाठी काम करायचं आहे. तिकीट का नाही मिळालं याची चर्चा मी पक्षश्रेष्ठींशी जरुर करेन. माझं काही चुकलं असेल तर त्याची माहिती घेऊन दुरुस्त करेन, असं तावडेंनी सांगितलं.
तावडे म्हणाले गेल्या 5 वर्षात अनेक चांगले उपक्रम, चांगल्या योजना राबवल्या. पंतप्रधान मोदींनी शिक्षण विभागाचं कौतुक केलं. पण ज्याअर्थी पक्षाला असं वाटलं तिकीट देऊ नये, तर मी त्यांच्याशी चर्चा करेन. मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले, पण शेवटी पक्षाचा निर्णय असतो, तो निर्णय मान्य आहे. निवडणूक झाल्यानंतर मी अमित शाह, संघटक मंत्र्यांशी चर्चा करेन, असं तावडे म्हणाले.