Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईVIDEO : मुंबईत जीएसटी भवनामध्ये अग्नितांडव, अजित पवार घटनास्थळी!

VIDEO : मुंबईत जीएसटी भवनामध्ये अग्नितांडव, अजित पवार घटनास्थळी!

Fire breaks out at GST Bhavan Mumbaiमुंबई : मुंबई व उपनगरांमध्ये आगीचे सत्र सुरुच आहेत. आज सोमवारी माझगावमध्ये जीएसटी भवनच्या  आठव्या मजल्यावर इमारतीला मोठी आग लागली आहे. आगीचं वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी दाखल झाले असून इमारतीच्या बाहेर गर्दी जमली आहे.

आग लागलेल्या इमारतीत जीएसटी कार्यालयाशिवाय सरकारच्या अन्य विभागाचीही कार्यालयं आहेत. सुरुवातीला इमारतीच्या आठव्या मजल्यावर आग लागली. नंतर ती नवव्या मजल्यापर्यंत गेली. दोन्ही मजल्यावरील कर्मचाऱ्यांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं आहे. आगीमुळं सर्व्हर रूमचं कुठलंही नुकसान झालं नसल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार पक्षाची बैठक सोडून तातडीनं घटनास्थळी पोहोचले आहेत.

अग्निशमन दिलेल्या माहितीनुसार, ही आग ‘लेव्हल तीन’ची आहे. एका मजल्यावर लागलेली ही आग आता तीन मजल्यांपर्यंत पसरली आहे. इमारतीवर धुराचे लोट दिसत आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. जीएसटी संदर्भातील कागदपत्रं आगीतून वाचवण्याचं आवाहन अग्निशमन दलापुढं आहे.

आगीची चौकशी केली जाईल…

आग लागल्यानंतर सर्व यंत्रणांना आग विझवण्याच्या सूचना करण्यात आली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मी बैठकीत असताना मला आगीची माहिती मिळाली. बैठक सोडून मी घटनास्थळी आलो. कागद जळाली असली तरी आपल्याकडे त्याचा डेटा आहे. असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments