Placeholder canvas
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईएमआयएमचा महाशिवआघाडीला पाठिंबा नाही : असदुद्दीन ओेवेसी

एमआयएमचा महाशिवआघाडीला पाठिंबा नाही : असदुद्दीन ओेवेसी

Asaduddin Owaisiमुंबई : सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्तास्थापन करता येऊ शकत नाही. या सर्व घडामोडी घडत असतांना एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आपण महाशिवआघाडीला पाठिंबा देणार नसल्याचे सांगितले. एमआयएमचे दोन आमदार निवडून आले आहेत.

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यातच भाजपापासून शिवसेनेने फारकत घेतली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करण्याती शक्यता व्यक्त होत आहे. अशातच ओवेसी यांनी आपण शिवसेना आणि काँग्रेसला पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

ओवेसी म्हणाले, धर्मनिरपेक्ष’ पक्षांच्या पराभवासाठी जे मला, माझ्या पक्षाला आणि आमच्या मतदारांना दोष देत होते त्यांना आता शांत होण्यासाठी एक कारण मिळालं आहे, असं ओवेसी यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील एमआयएमचे २ आमदार शिवसेना, राष्ट्रवदी आणि काँग्रेसचं सरकार स्थापन होत असेल तर आम्ही पाठिंबा देणार नाहीत. त्याच संदर्भात एक पत्र राज्यपालांना पाठवण्यात येईल, असंही ओवेसी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments