
मुंबई: शिवसेनेनं सोमवारी पाठिंब्याबाबत प्रथम संपर्क केला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मला फोन केला होता. अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांनी सांगितलं.
पटेल म्हणाले, सोमवारी उध्दव ठाकरेंनी संपर्क केल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सहकारी मित्र शरद पवार यांना आम्ही कळवलं. त्यानंतर आम्ही आज मुंबईत आलो व शरद पवारांशी चर्चा केली. पुढे आमच्या दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल.
राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई केली. काँग्रेसला चर्चेसाठी बोलवलं नाही. तसेच यापूर्वी केंद्राच्या सत्ताधीशांनी गोवा, अरुणाचल इतर काही राज्यामंध्ये सत्तेचा गैरवापर केला. महाराष्ट्रात जी राष्ट्रपती राजवट लागू केली त्याचं आम्ही निषेध व्यक्त करतो असं सांगितलं.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते के.सी.वेनूगोपाल, मल्लिकार्जून खरगे, प्रफू्ल्ल पटेल यांच्यासह इतर नेते उपस्थितीत होते.