Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईआदित्य ठाकरे- आदिती तटकरे सर्वात तरुण मंत्री

आदित्य ठाकरे- आदिती तटकरे सर्वात तरुण मंत्री

Aaditya Thackeray Aditi Tatkare,Aaditya, Thackeray, Aditi, Tatkareमुंबई : महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीच्या सरकारचा आज, सोमवारी दुपारी १ वाजता मंत्रिमंडळ विस्तार झाला. तिन्ही पक्षांचे एकूण ३५ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये २५ कॅबिनेट तर १० राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, या मंत्रिमंडळात सर्वात तरुण मंत्री शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्र्वादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे हे मंत्रिमंडळात सर्वात तरुण मंत्री आहेत.

शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची कॅबिनेटमंत्रीपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपदी संधी मिळाली आहे. हे दोघेही मंत्रिमंडळात सर्वात तरुण मंत्री आहेत. आदिती ह्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराचा सोहळा विधानभवनाच्या प्रांगणात संपन्न झाला. ३५ मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये शिवसेनेचे १३ राष्ट्रवादीचे १३ तर काँग्रेसचे १० नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये शिवसेनेचे १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री, राष्ट्रवादीचे १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री तर काँग्रेसचे ८ कॅबिनेट तर २ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

कॅबिनेट मंत्री…

अशोक चव्हाण, के सी पडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनिल केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख,

राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनट मंत्री…

अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे

शिवसेना कॅबिनेट मंत्री…

अनिल परब, आदित्य ठाकरे, उदय सामंत, संदिपान भुमरे, आशिष जैसवाल, संजय राठोड, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांचा समावेश आहे.

राज्यमंत्रीपद…

अब्दुल सत्तार
सतेज (बंटी) पाटील,
विश्वजीत कदम
शंभुराजे देसाई
बच्चू कडू
दत्तात्रय भरणे
आदिती ठाकरे
संजय बनसोडे
भानुदास तनपुरे
राजेंद्र पाटील

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments