Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रऊस दराबाबतची बैठक निष्फळ, शेतकरी संतप्त!

ऊस दराबाबतची बैठक निष्फळ, शेतकरी संतप्त!

मुंबई: ऊस दराबाबतची मुंबईतली बैठक निष्फळ ठरली. शेतकरी संघटना आणि सहकारमंत्र्यांमध्ये बैठक होती. त्यात शेतकरी संघटना ३ हजार ५००भावावर ठाम राहिल्याने कोणताच तोडगा निघू शकला नाही. ऊस उत्पादकांना साडेतीन हजारांचा भाव दिल्याशिवाय कारखाने चालू देणार नाही, असा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिला. तर राजू शेट्टींनी ३४०० चे भाव देण्याची मागणी लावून धरली. मात्र बैठकीत कोणताच तोडगा निघू शकला नाही.

दरम्यान, या बैठकीच्या निमित्ताने राजू शेट्टी आणि कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत हे दोन शेतकरी नेते प्रथमच आमनेसामने आल्याचं बघायला मिळालं पण त्यांच्यात कोणताच संवाद झाला नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये येत्या ८ तारखेला पुन्हा बैठक पार पडणार आहे. पण तोपर्यंत कारखाने चालू देण्यावर शेतकरी संघटना ठाम आहेत. मुंबईतली ऊसदराबाबतची बैठक निष्फळ ठरताच तिकडे कोल्हापुरात शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक बंद पाडलीय. तर उसाला साडे तीन हजारांचा दर देण्याची ही मागणी व्यवहार्य नसल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं आहे. एफआरपीचे पैसे सुलभतेनं मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, सिस्टीम ऑनलाईन केली जाईल, वजनकाटे नियंत्रणात ठेवण्यासाठी वजनकाटे समिती गठीत केली जाईल, असंही सहकार मंत्र्यांनी सांगितलं.

तर रघुनाथदादा पाटील यांनी गुजरात आणि इतर राज्यात एकाच पक्षाचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये उसाला चांगला भाव मिळतो. मात्र, महाराष्ट्रात एफआरपी कमी सांगितली जात आहे. त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागत आहोत. ऊस शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावू नका, असा इशाराही रघुनाथ पाटील यांनी यावेळी दिला. दरम्यान, सरकार शेतकऱ्यांच्याच बाजूनं काम करत असून त्यांना ऊसाला क्विंटलमागं ३४०० ते ३५०० रुपयांचा देण्यासाठी प्रयत्न करेल, असं आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments