Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहनांची एकमेकांना धडक; भीषण अपघातात पाच ठार, पाच गंभीर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहनांची एकमेकांना धडक; भीषण अपघातात पाच ठार, पाच गंभीर

नवी मुंबईतील पशुवैद्यकीय डॉक्टराचा कुटुंबियासह मृत्यू

major-accident-on-mumbai-pune-expressway many-vehicles-four-died-
major-accident-on-mumbai-pune-expressway many-vehicles-four-died-

मुबंई : मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर विचित्र अपघात झाला आहे. वाहनांनी एकमेकांना धडक देऊन झालेल्या या भीषण अपघाताच पाच जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. पुण्याकडुन मुंबईच्या दिशेने जात असताना बोरघाट उतरताना फुडमॉलजवळ हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 या विषयी अधिक माहिती अशी की, कंटेनरने इतर चार वाहनांना मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. कंटेनरने ट्रक, टेम्पो आणि दोन कारना मागून धडक दिली. अपघातात झुंझारे कुटुंबाचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब नवी मुंबईत वास्तव्यास होतं.

असा घडला अपघात?

मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरने मागून टेम्पोला धडक दिली. टेम्पो पलटी झाल्यावर मागून येणाऱ्या दोन कार टेम्पोला धडकल्या. या चारही गाड्यांवर पाठीमागून येणारा टेम्पो धडकल्याने अपघाताची भीषणता आणखी वाढली. या अपघाताचे दोन्ही कारचा चक्काचुर झाला आहे.

 या अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमावरुन परतताना हा अपघात झाला. तर अन्य दोन कार सोबत होत्या. परंतु, घाटात मुबंईकडे जाताना दोन कार पुढे निघुन गेल्या आणि या दोन कारचा अपघात झाला.

 मृतांची नावं –

१) मंजू प्रकाश नाहर (५८),

२) डॉ. वैभव वसंत झुंझारे, (४१)

३) उषा वसंत झुंझारे (६३)

४) वैशाली वैभव झुंझारे (३८)

५) श्रिया वैभव झुंझारे (५)

जखमींची नावं –

१) स्वप्नील सोनाजी कांबळे (३०)

२) प्रकाश हेमराज नाहर (६५)

३) अर्णव वैभव झुंझारे (११)

४) किशन चौधरी (गंभीर जखमी)

५) काळूराम जमनाजी जाट (गंभीर जखमी)

दोन जखमींना अष्टविनायक (पनवेल) व अन्य दोघांना वाशी येथे मनपा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर एका जखमी इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघातग्रस्त वाहनं –

कंटेनर RJ. 51.GB.2238

इनोव्हा Mh.12. LX. 4599

क्रेटा Mh. 47.AD.4025

टेम्पो MH. 14.GD.3880

ट्रक MH. 14.P.6870

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments