Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकर्जमाफीच्या कामासाठी राज्यातील सर्व बँकांमध्ये कामकाज चालू

कर्जमाफीच्या कामासाठी राज्यातील सर्व बँकांमध्ये कामकाज चालू

मुंबई : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे पूर्णत्वास नेण्यासाठी राज्यातील सर्व बँका महाशिवरात्री असूनही आज सुरुच राहणार आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी घेऊन महाशिवरात्री साजरा करता येणार नाही आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणत आनंद आहे तर कर्मचाऱ्यांनामध्ये काही प्रमाणात नाराजीचा सुर उमटून आला.

यात राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अन्य बँकांच्या महाराष्ट्रातील सर्व शाखा आज मंगळवार १३ फेब्रुवारी २०१८ रोजी सुरू राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात घेण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरंसिंगमध्ये बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज बँका सुरु ठेऊन पात्र खातेदारांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली होती. त्याला बँकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments