Tuesday, December 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात २४ तासांत ४ हजार ७८७ कोरोनाचे रुग्ण सापडले; ४० मृत्यू!

राज्यात २४ तासांत ४ हजार ७८७ कोरोनाचे रुग्ण सापडले; ४० मृत्यू!

maharashtra-reports-4787-new-covid-19-cases-3853-discharges-and-40-deaths

मुंबई: राज्यातील कोरोना संसर्ग पुन्हा वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरू आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात ४ हजार ७८७ नवे करोनाबाधितवाढले असून, ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर ३ हजार ८५३ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे.

राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू होतो की काय? अशी भीती देखील सर्वसामान्यांच्या मनात आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ७६ हजार ९३ वर पोहचली आहे.

आतापर्यंत १९ लाख ८५ हजार २६१ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३८ हजार १३ असून, आजपर्यंत करोनामुळे ५१ हजार ६३१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.६२ टक्के आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आजपर्यंत १५,४३,५५,२६८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी २० लाख ७६ हजार ९३ नमूने (१३.४३टक्के)पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९५ हजार ७०४ जण गृह विलगीकरणात असुन, १ हजार ६६४ जण संस्थात्कम विलगीकरणात आहेत.

राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची वेळ येऊ नये, यासाठी गर्दी टाळणे, मुखपट्टीचा वापर करणे, समारंभ साधेपणाने साजरे करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जनतेला केले. निर्बंध शिथिल करताना लागू असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा आदेशही त्यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments