मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष Ncp state president आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील jayant-patil यांनी करोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनाही करोना चाचणी करण्याची विनंती केली असून आपली प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखं काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो”.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) February 18, 2021
जंयत पाटील यांनी यावेळी आपण जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही सांगितलं आहे.
राज्यात २४ तासांत ४० मृत्यू; ४ हजार ७८७ करोनाबाधित रुग्ण
राज्यातील करोना संसर्ग आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरू आहे. बुधवारी २४ तासांमध्ये राज्यभरात ४ हजार ७८७ नवे करोनाबाधितवाढले असून, ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर ३ हजार ८५३ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे.
राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ७६ हजार ९३ वर पोहचली आहे. आतापर्यंत १९ लाख ८५ हजार २६१ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३८ हजार १३ असून, आजपर्यंत करोनामुळे ५१ हजार ६३१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.