Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमधुकर पिचडांनी पाप केलंय, गाठ माझ्याशी आहे : अजित पवार

मधुकर पिचडांनी पाप केलंय, गाठ माझ्याशी आहे : अजित पवार

अहमदनगर : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी झालेले माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हल्ला चढवला. राष्ट्रवादीने पिचडांना सर्वकाही दिलंपण तरीही पिचडे गेलेत्यांनी मोठं पाप केलं. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या भाबळी. केसाला धक्का लावला तर अजित पवारशी गाठ आहेअसा इशारा अजित पवारांनी पिचड पितापुत्रांना दिला.

भाजपसारख्या पक्षाचा पराभव करण्यासाठी एकविचाराचे सर्व एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीतून राजे गेलेसेनापती गेलेनेतेही गेले. पण शरद पवार ठामपणे काम करत आहेत. १९९५-१९९९ मध्ये  युतीचं सरकार तेव्हा पिचडांना विरोधी पक्षनेतेपद दिलं. मंत्रिपदे दिलीजि.प. अनेक पदे अकोलेत यांनाच दिली. तरीही पिचड गेलेमोठं पाप पिचडांनी केलं आहे. एकास एक उमेदवार देण्याच्या निर्णयावर ठाम राहा. आमिषाला बळी पडू नका. कार्यकर्त्यांना दमबाजी करु नका”, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

पिचड डोळ्यात पाणी आणतीलभावनिक होतीलनिवडून द्या असा नाटकीपणा करतीलपण तुम्ही बळी पडू नकाअसं आवाहन अजित पवार यांनी केलं. सीताराम गायकरचं काय झालं असा जनतेतून सूर उमटला. विधानसभेला राष्ट्रवादीला निवडून द्यात्यांचं ( सीताराम गायकर ) यांचं धोतर फेडूअसं म्हणत अजित पवारांनी पिचडांचे निकटवर्तीय तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर यांच्यावरही हल्ला चढवला.

आमचं सरकार आलं तर संपूर्ण कर्जमाफी देणार. दिली नाही तर पवारांची औलाद नाही. थोर पुरूषांची नावं घेऊन सत्तेवर आले. पण कोणतंही आश्वासन पूर्ण केली नाहीत. गड किल्यात आता छमछम सुरू करणार. आम्ही बंद केलेले डान्स बार यांनी सुरू केलेअसं म्हणत अजित पवारांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.

निवडून द्यामी बारामतीऐवजी अकोलेचा गुलाल घेण्यासाठी येईन. मी अकोलेसाठी खूप दिलं. मी शब्दाचा पक्का आहे. पाच वर्षात 15 वर्षापेक्षा जास्त काम करुन दाखवेनअसं आश्वासन अजित पवारांनी दिलं.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या पिचड-पुत्रांना आव्हान देण्यासाठी भाजपमधील अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटेजि. प सदस्या सुनीता भांगरेआदिवासी नेते अशोक भांगरे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी कमळ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. पिचडांच्या मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments