Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रआत्महत्या की हत्या ! विहिरीत आईसह चार मुलींचे आढळले मृतदेह

आत्महत्या की हत्या ! विहिरीत आईसह चार मुलींचे आढळले मृतदेह

Image : Divya Marathi

बुलढाणा : एका विहिरीत आईसह चार मुलींचे मृतदेह आढळून आल्याने बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील माळेगावात ही घटना घडली आहे. ही  हत्या की आत्महत्या हे अद्याप उघड झाले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

आई उज्वला ढोके (वय ३५), मुलगी वैष्णवी ढोके (वय ९), दुर्गा ढोके (वय ७), आरुषी ढोके (वय ४), पल्लवी ढोके वय (एक वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. या विषयी अधिक माहिती अशी की, मेहेकर तालुक्यातील माळेगाव परिसरात असलेल्या एका विहिरीत सोमवारी सकाळी पाच मृतदेह तरंगत असल्याचे शेतकऱ्यांना दिसले.

ही माहिती गावात पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, विहिरीत आढळलेले पाच मृतदेह एका आईसह चार मुलींचे आहे. त्यांनी आत्महत्या केली की, त्यांची हत्या करण्यात आली याचा उलगडा झाला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments