Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्र९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख

९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख

मुंबई: ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये बडोदा येथे साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवारी झाली. अध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख, राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप, रवींद्र गुर्जर असे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

ज्येष्ठ कादंबरीकार, कथालेखक व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी साहित्यिक रवींद्र शोभणे यांचा ७० मतांनी पराभव केला. पंचरंगी लढतीत देशमुख यांना ४२७ मते मिळाली तर शोभणे यांना ३५७ मते मिळाली आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल देशमुख यांच्यावर साहित्यक्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सनदी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना देशमुख यांनी ‘सलोमी’, ‘ऑक्टोपस’, ‘अंधेरनगरी’, ‘हरवलेले बालपण’, ‘अग्निपथ’, ‘मृगतृष्णा’ अशा २६ पुस्तकांचे लेखन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments