Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकोट्याधीश असल्यामुळे लाड यांना आमदारकीचा ‘प्रसाद’ पावला!

कोट्याधीश असल्यामुळे लाड यांना आमदारकीचा ‘प्रसाद’ पावला!

मुंबई : भाजपाने विधान परिषदेचे उमेदवार प्रसाद लाड यांच्याकडे एकूण २१० कोटी ६२ लाख रुपयाची संपत्ती आहे. ही आकडेवारी त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पुढे आली. पक्षाने इतर निष्ठावंताना नाकारल्याने पक्षात नाराजी उमटली. राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेल्या लाड यांच्या संपत्तीवरुन त्यांना आमदारकीचा “प्रसाद” पावला? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

लाड यांच्याकडे ४७ कोटी ७१ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. लाड यांच्या एकूण जंगम मालमत्ता पैकी ३९ कोटी २६ लाख रुपये शेअर्स आणि बाँडच्या स्वरूपात गुंतवणूक केलेली आहे. त्यांची पत्नी नीता यांच्याकडे ४८ कोटी ९५ लाख, मुलगी सायली कडे एक कोटी १५ लाख, आणि मुलगा शुभम याच्याकडे २८ लाख २८ हजार रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. लाड यांच्याकडे ५५ कोटी ८६ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

त्यामध्ये पाथर्डी तालुक्यातील शेतजमीन, मुंबईतील सायन येथील एक फ्लॅट, पुण्यातील एरंडवणे येथील एक कार्यालय, दादर येथील एक व्यवसायिक इमारत, दादरच्या प्रसिद्ध कोहिनुर मिल इमारत मधील सदनिका आणि माटुंगा येथील एक निवासी इमारत यांचा समावेश आहे. लाड यांच्या पत्नीकडे ५४ कोटी ९४ लाखाची स्थावर संपत्ती आहे. त्यामध्ये खालापूर येथील शेत जमीन, माटुंगा येथील व्यवसायिक इमारत, चेंबूर येथील निवसी इमारत या स्थावर मालमत्ताचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त लाड कुटुंबीयांकडे सामूहिक अशी १० कोटी ४५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ताही आहे. लाड कुटुंबीयांच्या संपत्तीचा जसा आकडा मोठं आहे, तसंच त्यांच्यावरील कर्जाचा आकडा देखील मोठा आहे. प्रसाद लाड यांच्यावर ४१ कोटी ४८ लाखांचे कर्ज आहे. पत्नी नीता यांच्या नावे ४२ कोटी २१ लाखाचे कर्ज आहे . मुलगी सायली हिच्या नावे १ कोटी ७ लाख तर मुलगा शुभम याच्या नावे १८ लाख ४९ हजार रुपयांचे कर्ज आहे. प्रसाद लाड वर्षाला चार कोटी २२ लाख इन्कम टॅक्स भरतात. तर त्यांची पत्नी १ कोटी ८४ लाख इन्कम टॅक्स भरत असल्याचे त्यानी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments