Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeकोंकणठाणेआयपीएच ठाणे तर्फे चिंता आणि नैराश्य या मानसिक समस्यांकरिता स्वमदत आधार गट...

आयपीएच ठाणे तर्फे चिंता आणि नैराश्य या मानसिक समस्यांकरिता स्वमदत आधार गट सरू करण्यात येणार

ठ़ाणे – आयपीऐएच, ठाणे या संस्थेतफे तर्फे चिंता आणि नैराश्य या मानसिक समस्यांकरिता Cape of Good hope हा स्वमदत आधार गट लवकरच सुरू करण्यात येत आहे. याचा शुभारंभ 9 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी 6 वाजता सहयोग मंदिर हॉल, ठाणे येथे होईल. यावेळी आयपीएच चे संचालक डॉ. आनंद नाडकर्णी, ठाण्यातील प्रसिध्द मनोविकार तज्ञ डॉ. श्रीकांत जोशी आणि दिशा काऊंसेलिंग सेंटरच्या समुपदेशक समिंदरा सावंत तसेच या गटाचे समन्वयक डॉ. शैला पाटील, रुपाली खराडकर व स्वप्नील पांगे हे उपस्थित राहणार आहेत. चिंता नैराश्य याबद्दलचे समज-गैरसमज तसेच अशा स्वमदत आधार गटाची आवश्यकता या विषयावर या कार्यक्रमात चर्चा होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. नियमित गट सप्टेंबरपासून दर महिन्याच्या एका शनिवारी संध्याकाळी ठाण्यात होईल. अधिक माहितीसाठी संध्या भास्कर (9870115693) यांच्याशी संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments