Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeकोंकणठाणेमनसेची ठाण्यामध्ये गुजराती समाजाविरूध्द बॅनरबाजी

मनसेची ठाण्यामध्ये गुजराती समाजाविरूध्द बॅनरबाजी

ठाणे : ठाण्यातील मराठी विरुद्ध गुजराती वादानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. “जर कोणाला घर विकायचं असेल तर मराठी माणसालाच घर विका असे होर्डिंग  मनसेने ठाण्यात लावले आहेत. ‘आपलं ठाणे, मराठी ठाणे’, असं लिहून “आपलं घर-मालमत्ता मराठी माणसालाच विका!”, लढा ठाण्याच्या मराठी माणसाचा असा आशय या होर्डिंगवर आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजराती विरूध्द मराठी असा वाद पेटण्याची शक्यता आहे.

मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे नेते अभिजीत पानसे यांची नावं या पोस्टर्सवर आहेत.

ठाण्यात मराठी माणसांना घर भाड्यानेही मिळणं कठीण झालं आहे. काही दिवसापूर्वीच एका सोसायटीत मराठी आणि गुजराती कुटुंबामध्ये वादावादी झाली होती. राहुल पैठणकर आणि हसमुख शहा या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी हसमुख शहा यांनी राहुल पैठणकर यांना या सोसायटीत राहण्याची तुमची लायकी नाही असं म्हणत अवहेलना केली होती.   इतकंच नाही तर शहा पिता-पुत्रांनी राहुल पैठणकर यांना बेदम मारहाणही केली होती. या सर्वप्रकारानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी हसमुख शहा यांना कान धरुन माफी मागायला लावली होती.

नौपाड्यातील विष्णूनगर हा मराठी भाषिक परिसर आहे. येथील सुयश सोसायटीत पाचव्या मजल्यावर राहुल पैठणकर हे मराठी भाषिक आणि सहाव्या मजल्यावर हसमुख शाह हे गुजराथी भाषिक कुटुंबासह वास्तव्य करतात. 11 सप्टेंबर रोजी राहुल यांच्या आईची चप्पल लिफ्टमध्ये अडकल्याने लिफ्ट अडकली होती. तेव्हा,वरच्या मजल्यावरील शहा कुटुंबीयांनी याबाबतची विचारपूस राहुल यांच्याशी केली असता, दोन्ही कुटुंबात वाद झाले. या वादाचे पर्यवसान भांडण आणि शिवीगाळीत होऊन दोन्ही कुटुंबाकडून एकमेकास हाणामारी करण्यापर्यंत मजल गेली. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांची उणीदुणी काढली होती.

तथापि,शहा पिता-पुत्रांनी राहुल यांना मारहाण केल्याची सीसीटीव्ही चित्रफीत सोशल मीडियात व्हायरल करून काही जणांनी या वादाला मराठी विरुद्ध गुजराथी भाषिक वादाची फोडणी दिली. या व्हायरल चित्रफितीमुळे ठाण्यातील वातावरण ढवळून निघाले. दोन्ही कुटुंबातील हा वाद नौपाडा पोलीस ठाण्यात पोहचला. पोलिसांनीही दोघांच्या तक्रारी नोंदवून घेत दोन्ही कुटुंबाना नोटीस बजावली असून या वादावर पडला आहे. मात्र,सोशल मीडियात चांगल्याच प्रकारे व्हायरल होत आहे.

मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी शहा यांचा शोध घेत त्यांना मनसे स्टाईलने माफी मागण्यास भाग पाडले. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला व्हिडिओ समोर कोणाला शिवीगाळ आणि मारहाण करू नये असे आदेश दिल्याने मी याला कॅमेरासमोर आता माफी मागायला सांगितली आहे मात्र त्याला नंतर मनसे स्टाईलने चोप देणार असल्याचा व्हिडीओ तयार करत तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments