ठाणे: महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिलांसाठी कायदा, शिक्षण, बचतगट, सौंदर्यप्रसाधने आदींबाबत विशेषतज्ज्ञांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 8 मार्च महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार, ठाणे शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे महिलाध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयामध्ये आनंद परांजपे आणि समाजसेविका ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी, अंजली मंगेश हाडवळे यांनी समाजसेवा, रुग्णसेवा, , शैक्षणिक सहकार्य , सरकारच्या योजना , पोलिस सहकार्य , जनजागृती आदी विषयांवर; वैष्णवी समीर परांजपे यांनी कायदेविषय; समाजकल्याण खात्यातील अधिकारी मनीष वाघमारे यांनी महिला बचत गटाविषयी तर, सौंदर्य तज्ज्ञ रंजीता गुळेकर यांनी महिलांना पार्लर- सौंदर्यप्रसाधने या विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी ठामपाच्या महिला बालकल्याण सभापती राधाबाई जाधवर, उथळसर प्रभाग समिती सभापती वहिदा खान, कळवा प्रभाग समिती सभापती वर्षा मोरे, सुनिता सातपुते, वनिता घोगरे, अंकिता शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहर कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, ठाणे शहर युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, नवी मुंबई प्रभारी प्रियांक सोनार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे ठाणे अध्यक्ष कैलास हावळे, सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष रमेश दोडके, असंघटीत कामगार सेलचे ठाणे शहराध्यक्ष राजू चापले, व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व विधानसभाध्यक्षा, विभागाध्यक्षा, ब्लॉक अध्यक्षा, प्रभाग अध्यक्षांसह सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.