Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeकोंकणठाणेपूरग्रस्तांसाठी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पाठवले जीवनावश्यक साहित्य

पूरग्रस्तांसाठी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पाठवले जीवनावश्यक साहित्य

ठाणे (प्रतिनिधी) – सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या पुरस्थितीमुळे हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. हे संसार पुन्हा उभे करण्यासाठी ठाणेकरांनी हातभार लावावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ‘संघंर्ष या संस्थेच्या माध्यमातून केले होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आवाहनाला ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आज (सोमवारी) 22 टनाचे 2 ट्रक जीवनाश्यक साहित्य सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने आ. आव्हाड यांनी रवाना केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील उपस्थित होते.

कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा मोठा फटका बसला आहे. या पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. हे संसार उभे करण्यासाठी प्रत्येकाने जमेल तशी मदत करावी, असे आवाहन आ. आव्हाड यांनी केले होते. राष्ट्रवादी उपाध्यक्ष रचना वैद्य यांच्या नियोजनाखाली ठाणे शहरातील पुढील सोसायटी मधील रहिवाशी शिवाई नगर म्हाडा कॉलनी, लक्ष्मी नारायण रेसीडेन्सीर, निळकंठ हाईट्स, गावंड बाग, नीळकंठ ग्रीन्स,सत्य शंकर रेसिडेन्सी, अ‍ॅक्मे ओझोन, ईडन वुड्स फेडरेशन, हिरानंदानी मेडोज, हाईड पार्क, निहारीका कनाकिया स्पेस, हायलँड पार्क, हिरानंदानी इस्टेट, लोढा, रुस्तमजी अर्बानिया, वृंदावन सोसायटी, रहेजा गार्डन, वसंत लॉन्स, विकास पाम्स, ओएसिस सफायर, रंग श्री सोसायटी, यशवर्धन सोसायटी, पंचशील सोसायटी, एक संघर्ष मित्र मंडळ, पांचपाखाडी, ठाणे तसेच इतर दानशूर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अवघ्या तीनच दिवसात दानशूर ठाणेकरांनी ब्लॅंकेट, कपडे, बिस्कीटे, गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, चहा पावडर, डाळी, मीठ- मसाला, मिनरल वॉटरच्या बाटल्या तसेच सॅनिटरी नॅपकीन्स, फिनेल, डेटॉल आदी जीवनावश्यक वस्तू राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जमा केल्या. आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आ. आव्हाड यांनी दोन ट्रकमध्ये भरून हे साहित्य सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना केले.

ना ओळखीचे, ना पाळखीचे; ज्यांना सांगली- कोल्हापूर कुठे आहे, हे माहित नाही. अशा लोकानींनीही मदत केली. हा प्रतिसाद बघून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणेकरांचे आभार मानले. पण, त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये हजार रुपयाला एक संसार म्हणजे चार वाट्या, चार जेवणाची ताटे, पोळपाट-लाटणे, कढई, 4 भांडी, 4 मोठे चमचे, 1 बादली, 2 मग, 1 तवा, आदी संसारोपयोगी वस्तू की ज्यातून स्वयंपाक होऊ शकेल अशा वस्तू पाठवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठाणेकरांकडून केवळ एक हजार रुपयाची अपेक्षा आहे. या हजार रुपयात आपण एक संसार उभा करूया. आपल्या आया- बहिणींच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबूयात . मायेचा हात फिरवू या ; त्यांना आज माहेरची गरज आहे. आपण माहेर म्हणून उभे राहू या, असे आवाहन आ. आव्हाड यांनी केले. यावेळी उपस्थित महिला अध्यक्षा सुजाता घाग, सरचिटणीस प्रभाकर सावंत, विधानसभा अध्यक्ष नितीन पाटील, विजय भामरे, कार्याध्यक्ष महेंद्र पवार, विक्रांत घाग, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, रविंद्र पालव, समीर भोईर, निलेश फडतरे, कार्याध्यक्ष प्रदिप झाला, कौस्तुभ धुमाळ, विधानसभा अध्यक्ष दिपक पाटील, युवक उपाध्यक्ष संकेत नारणे, युवक ब्लॉक अध्यक्ष अजय मिश्रा, युवक पदाधिकारी यशवंत निंबर्गी, महेश भाग्यवंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुरेश जाधव, वॉर्ड अध्यक्ष सुमित गुप्ता, जितेंद्र मिश्रा, गोविंदा मोरे, सुभाष चव्हाण, प्रशांत शिवलीकर, फ्रंटल / सेलचे अध्यक्ष प्रफुल कांबळे, सचिन पंधारे, अ‍ॅड. विनोद उतेकर, महिला पदाधिकारी वंदना लांडगे, वंदना हुंडारे, पुजा जाधव, शुभांगी कोळपकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments