Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रजोगेश्वरीत शाळेतील २९ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

जोगेश्वरीत शाळेतील २९ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

मुंबई – शालेय विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी महापालिकेकडून शाळेतून खिचडी दिली जाते. मात्र याच खिचडीतून खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी जोगेश्वरी पूर्व येथील बाल विकास शाळेतील २९ विद्यार्थांना खिचडीमधून विषबाधा झाली आहे. या घटनेमुळे शिक्षणवर्तुळात खळबळ उडाली आहे.

महानगरपालिकेच्या माध्यमातून खासगी संस्थांना खिचडी वाटपाचे काम दिले जाते. जोगेश्वरी शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडी वाटपाचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. जोगेश्वरी पूर्व येथील बाल विकास शाळेतील विद्यार्थांना खिचडी देण्यात आली होती. त्यामधून शाळेतील २९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.

या विद्यार्थ्यांना शाळेच्या जवळच्या कोकण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यावर विद्यार्थ्यांना सलाईन लावण्यात आले आहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काळजीपूर्वक काम न करणाऱ्या संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असे शिक्षणसुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments