Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeविदर्भनागपूरधनगर आरक्षणाच्या मुद्यावरून जयंत पाटलांचे अनोखे आंदोलन

धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून जयंत पाटलांचे अनोखे आंदोलन

नागपूर – धनगर आरक्षणाच्या मुद्यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी अनोखे आंदोलन केले. जयंत पाटील यांनी धनगर समाजाचा पारंपरिक पेहराव करून विधानसभेच्या आवारात फेरफटका मारला. त्यानंतर त्याच वेशात पाटील विधानसभेत आले.

डोक्यावर फेटा, घोळदार धोतर, अंगावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन त्यांनी सभागृहात प्रवेश केला. सभागृहात प्रवेश करताना राष्ट्रवादीच्या आमदारांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या घोषणा दिल्या. तसेच ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ च्या  घोषणांनी सभागृह दणाणून गेले. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पाटील यांना हातातली काठी बाहेर नेण्यास सांगितले. पण माझा पाय मुरगळल्याने काठी आणली असल्याचे पाटील यांनी उत्तर दिले.

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  ही वेशभूषा केल्याचे त्यांनी सांगितले. या सरकारने पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकारला धनगर समाजाचा विसर पडला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या वेशात आलो आहे. काठी हे धनगर समाजाचे प्रतीक आहे. सरकारने धनगर समाजाची मागणी मान्य केली नाही, तर धनगर समाज हीच काठी हातात घेईल याचे भान सरकारने ठेवावे असेही पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments