Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeदेशप्रद्युम्न हत्या प्रकरणी अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालणार!

प्रद्युम्न हत्या प्रकरणी अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालणार!

नवी दिल्ली – प्रद्युम्न हत्या प्रकरणातील रियान इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असलेल्या १७ वर्षीय आरोपीला प्रौढ गृहीत धरून खटला चालवण्यात येणार आहे. यावर प्रद्युम्नच्या वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

आरोपीचा जामीन अर्ज गुरुग्राम न्यायालयाने फेटाळला असून त्याला प्रौढ गृहीत धरून खटला चालवण्यात यावा, असे आवाहन प्रद्युम्नच्या कुटुंबियांनी केले होते. बुधवारी गुरुग्राममधील ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाकडून हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे.

८ सप्टेंबरला प्रद्युम्नचा मृतदेह रियान इंटरनॅशन स्कूलमधील बाथरूममध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच शाळेच्या ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षा पुढे ढकलण्यासाठी ही हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तर, सत्य लपवण्यासाठी आपल्या मुलाला अडकवले जात असल्याचे आरोपीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments