Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्र‘जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर

‘जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र व दिलखुलास कार्यक्रमात गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांचा ‘ हक्काचा निवारा : सर्वांसाठी’ या विषयावर मुलाखत होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून 30 जुलै रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 यावेळेत प्रसारित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि.30 आणि बुधवार 31 जुलै 2019 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गृहनिर्माण विभागातील योजनांना गती देण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, 2022 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हे उद्दिष्ट, प्रधानमंत्री आवास योजनेची सद्य:स्थिती, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थातच म्हाडाचे धोरण, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाचे धोरण, झोपडपट्टी पुनर्विकास आणि त्यासंबंधी महत्वपूर्ण घेण्यात आलेले निर्णय, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुथान अभियान, संक्रमण शिबिरातील रहिवाशांना घरे देण्यासाठी शासनाची भूमिका, आणि महाराष्ट्र गृहनिर्माण नियमन आयोग अर्थात महारेरा आदी विषयांची माहिती श्री. वायकर आणि श्री. मिरगणे यांनी ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments