Monday, March 17, 2025
Homeमहाराष्ट्रमाळशिरसमध्ये तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान

माळशिरसमध्ये तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान

सोलापूर : दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली. माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चक्क तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झाला आहे. तृतीयपंथी सरपंच होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची मतमोजणी आज सुरु आहे. यात तरंगफळ गावातील गावकऱ्यांनी भाजप पुरस्कृत तृतीयपंथ ज्ञानदेव कांबळे यांना निवडून दिलं.  दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सुमारे ४ हजार ग्रामपंचायतीसाठी १६ ऑक्टोबरला मतदान झालं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments