Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्र'फेरीवाल्यांकडून मी काहीही खरेदी करणार नाही', दादरकरांची शपथ

‘फेरीवाल्यांकडून मी काहीही खरेदी करणार नाही’, दादरकरांची शपथ

मुंबई – अनधिकृत फेरीवाल्यांना आळा घालण्यासाठी दादरमध्ये रविवारी काही नागरिकांनी एकत्र येऊन फेरीवाल्यांकडून काहीही खरेदी करणार नाही, अशी शपथ घेतली. ‘फ्रेंड्स ऑफ दादर’ या सामाजिक संस्थेने हा अनोखा उपक्रम राबविला. या उपक्रमाला दादरकरांनी देखील प्रतिसाद देत फेरीवाल्यांविरोधात आपला सहभाग नोंदवला आहे.

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला. यावरून राजकीय वातावरणही तापले. तसेच न्यायालयानेही या फेरीवाल्यांना हटविण्याचे आदेश दिले. मात्र, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे आता नागरिकच पुढे आले आहेत. दादरमधील नागरिकांनी फेरीवाल्यांकडून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याची शपथ घेतली. पूर्वी फेरीवाले असताना दादर स्टेशनजवळ चालायची सोय नव्हती. आता फेरीवाले मुक्त दादर झाल्यानंतर ‘बेस्ट’ ने त्या ठिकाणी बस सुरू केली आहे. एवढा स्वच्छ मोकळा रस्ता दादरकरांना वापरायला मिळत आहे. हा नक्कीच दादरकरांचा विजय आहे. अनधिकृत फेरीवाल्यांचा त्रास सर्वात जास्त प्रमाणात दादरकरांनाच सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया देत अनधिकृत फेरीवाल्यांकडून वस्तूच खरेदी करायच्या नाहीत, अशी शपथ ‘फ्रेंड्स ऑफ दादर’ या ‘एनजीओ’च्या सदस्यांनी घेतली. त्याचबरोबर इतरांनी देखील खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात आले. गेल्या काही वर्षात दादरमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. याचा त्रास निश्चितच दादरच्या रहिवाशांना सहन करावा लागत आहे, इतर विक्रेते दादरच्या विक्रेत्यांकडून खरेदी करत असल्यामुळे या ठिकाणच्या विक्रेत्यांची मुजोरी वाढली आहे. त्यामुळेच आज आम्हाला अशी शपथ घ्यावी लागली असल्याची प्रतिक्रिया या समन्वकांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments