Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रकर्जमाफीमुळे पोटात दुखतं, मग बँकांना ८० हजार कोटी कसे दिले? : पवार

कर्जमाफीमुळे पोटात दुखतं, मग बँकांना ८० हजार कोटी कसे दिले? : पवार

पंढरपूर : महाराष्ट्रातील अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिल्यावर काही मंडळींच्या पोटात दुखत आहे, पण गेल्या १५ दिवसात राष्ट्रीयकृत बँकांचा तोटा भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने तिजोरीतून ८० हजार कोटी रुपये कसे दिले?, असा सवाल माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

अकलूज येथील रत्नाची महिला वसतिगृहाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते पाटील इत्यादी नेते उपस्थित होते.
“सरकारकडे शेतकऱ्यांच्या सोसायटीचे पैसे भरायला पैसे नाहीत आणि बँकांच्या तूट भरायला पैसे कुठून आले?”, असा प्रश्न उपस्थित करत, कोणाच्या कितीही पोटात दुखले तरी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, त्याच्या डोक्यावरचे ओझे उतरवून त्याला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी ठाम भूमिका पवार यांनी घेतली.
यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी देशाच्या कृषी आणि आर्थिक धोरणावर सडकून टीका केली. देशाचा विकासदर घसरला असून, कृषी आणि औद्योगिक उत्पादनावर याचा विपरीत परिणाम झाला असल्याचे पवार यांनी सांगितले. नवीन करप्रणाली, नोटाबंदीचे परिणाम आता दिसू लागले असून देशाची परिस्थिती चिंताजनक बनल्याचे पवार यांनी सांगितले.
नागपूर अधिवेशनानंतर दोन्ही काँग्रेस एकत्रित आले असून आता या सरकारच्या विरोधात एकत्रित काम करण्याची भावना दोन्ही पक्षांच्या नेत्यांची असल्याचे पवार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments