मुंबई: प्रसिद्ध स्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम सातपुते यांचा मुंबईतल्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला. पंचेचाळीस वर्षीय डॉ सातपुते अंधेरी पश्चिमेला फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. त्यांना मधुमेहाचा आजार होता. ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलिस करत आहेत.
काल रात्री घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने, शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडल्यानंतर आत पूनम यांचा मृतदेहच आढळला. पूनम यांना अतिशय दुर्धर स्वरुपाचा मधुमेह होता. त्यांनी २२ डिसेंबरला फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. त्यानंतर त्यांच्याशी कोणाचा संपर्क नव्हत.दरम्यान, पूनम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम सातपूते यांची हत्या की आत्महत्या!
RELATED ARTICLES